रविवार, २० सप्टेंबर, २०१५

रामसेतु


विश्वास      [  मुक्तछंद]
                 -------------------------
विश्वास या शब्दाचं वैशिष्टय म्हणजे
या शब्दात श्वास आहे.......
अन् श्वासावर कुणाचा विश्वास नसतो                        पण श्वासाने केलेला विश्वासघात लिहिण्यासाठी
परत श्वास पाहिजे.........
जावू दे,साराच गोंधळ
ताजमहालला कोण विचारलं असतं
रामसेतू प्रेमाचं प्रतिक झालं असतं
जर ठेवला असता विश्वास सीतेवर तर
रामयुगात खरच रामयुग आलं असतं.
         - जगदिश पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा